Panchkarma, Medicine, Yoga, Diet
XYZ- सर थोडी छातीत जळजळ होत आहे व पोटही व्यवस्थित साफ होत नाही आहे..
AAROGYAM -हि तक्रार किती दिवसांपासुन आहे??
XYZ-साधारण 1 महिन्यापासुन आहे आज जास्त होत आहे कारण रात्री match मुळे उशिरा झोपलो व आज सकाळी आमच्या सोसायटी मध्ये Yoga Day चा event होता म्हणून सकाळी लवकर उठुन तिथे गेलो..थोडा yoga केला..नाश्ता केला व हा त्रास सुरु झाला..
AAROGYAM -सर कुठलाही योगा किंवा व्यायाम हा पूर्ण झोप झाली असेल व पोट व्यवस्थित साफ झालं असेल तेव्हाच करावा बळांत करु नये..आणि शक्यतो कुठल्याही गोष्टींच दडपण न घेता करावा..शास्त्र असतं ते..
शास्त्र काय म्हणतं..
1)आसन-स्थिरम सुखम् आसनम्।
शरीराची स्थिर व सुखकारक अशी ठराविक स्थिती घेणे म्हणजे आसन होय.हा व्यायामाचाच एक प्रकार आहे परंतु आसन व्यायाम नाही.
2)व्यायाम-शरीरायासजनकं कर्मं व्यायामसंज्ञितम्।
व्यायामामुळे शरीराला आयास(श्रम) exertion व्हायला हवेत.
3)योग-योगश्चित्तवृत्तिनिरोधः। (Source - पातञ्जलयोगसूत्र 1.2)
-योग आपल्या चंचल मनाच्या गतीला स्थिर करत.
-योग चित्त (अर्थात् अन्तःकरण) को विभिन्न रूप (वृत्ति) लेने से रोकता है।
-Yoga is restraining the mind (Chitta) from taking various forms (Vrittis).
•आसनं स्थिर झाल्याशिवाय प्राणायाम करावयाचा नाही.
•आसनं किंवा व्यायाम झाल्यानंतरच प्राणायाम करावा.
•अयोग्य प्राणायामाने उचकी,खोकला,दमा,शिरशुल इ.आजार निर्माण होतात.
•अष्टांग योग(यम>नियम >आसन>प्राणायाम>प्रत्याहार>धारणा>ध्यान> समाधी) यातील उत्तरोत्तर क्रम व प्रत्येक योगातील चर्येला follow करणं अत्यंत महत्वाचे आहे.
•जो यम व नियम follow करतो त्याला आसन व प्राणायामाचा पुर्ण उपयोग होतो.यम व नियम या अष्टांग योग मधील पहिल्या दोन पायऱ्या आहेत यांत काय follow कराव यासाठी अष्टांग योग image खाली share केली आहे..
•Yoga day ने awareness चा purpose साध्य होत आहे पण रोज..हो रोज..आपल्या शरीरासाठी 30 मिनिटे प्रत्येकाने राखीव ठेवणे गरजेचे आहे...
"हाचि माझा योग हाचि माझा यज्ञ।
हेचि जपध्यान नाम तुझे।।"
-वैद्य महेश पाटील
आरोग्यम् आयुर्वेदा
बाणेर,पुणे.
Aarogyam Ayurveda
“Amrut villa”,Flat no.201-202,Beside Prathmesh Park Entrance,Near Balewadi Phata,Baner-Balewadi main road,Baner-411045